Connect with us

National News Politics

मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम राजकीय हेतूपोटी सुरु आहे: अनिल देशमुख

Anil Deshmukh

Anil Deshmukh

“मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम राजकीय हेतूपोटी सुरु आहे”, असे वक्त्यव्य राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले होते.

न्यायप्रविष्ट तरीही छापेमारी कशी?

देशमुख म्हणाले, “सीबीआयला राज्यात महाराष्ट्र सरकारच्या परवानगीशिवाय तपास करता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची चांगलीच गोची झाली होती.”

“10-15 वर्षापूर्वीच्या गोष्टी बाहेर उकरून काढल्या जात आहेत. यात काहीही तथ्य नाही. जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरु आहे. आघाडीच्या मंत्र्यांविरोधात भाजपने कटकारस्थान रचून त्यांचे राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचे कंत्राट भाजपने घेतले आहे,” अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

“केवळ धाडी टाकून सर्व यंत्रणेचा दुरुपयोग केंद्र सरकार करीत आहे”, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला.”

नितिन चौधरी, राष्ट्रीय ओबीसी मुक्ति मोर्चा, म्हणाले…

“परिणामी, सूडबुद्धीतून राजकीय कारकीर्द उध्वस्त करण्याचा डाव भाजप खेळत आहे. आधी सीबीआय व आता ईडीने मुंबई, नागपूर येथील देशमुख यांच्या कार्यालयावर आणि घरांवर छापेमारी केली आहे. मात्र, अजूनही काहीही सापडलेले नाही. निव्वळ नाहक त्रास देऊन बदनामी करण्याचा खेळ भाजप खेळत आहे. परमबीर सिंग यांनी याचिका दाखल करून देशमुख यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीही, सीबीआय व ईडी देशमुख यांना अडचणीत आणण्यासाठी कंबर कसत आहेत. निव्वळ आणि निव्वळ सूड उगारून जनतेमध्ये देशमुख यांची प्रतिमा आणखी मलीन करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय.

देशमुख यांनी मागील 30 वर्षांच्या कार्यकाळात पारदर्शक कामे केली आहेत. गृहमंत्री पदाच्या जवळपास दीड वर्षांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी करूनही खोट्या प्रकरणात अनिल देशमुख यांना भाजपकडून अडकविण्यात आले. यामागे भाजपचं सूडबुद्धीचं राजकारण आहे.

देशमुख यांना गोत्यात आणण्यासाठी भाजपने रचलेला हा आधीच सुनियोजित डाव आहे. सारं काही आलबेल असताना भाजपने सुडाच्या भावनेतून खोटेनाटे आरोप करून देशमुख यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी चालविलेले षडयंत्र आहे.

राजकीय सूडबुद्धीतून राजकारण संपुष्टात आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाला ओळखले जाते. देशमुख यांच्या प्रकरणावरून भाजप सुडाचे राजकारण करीत असल्याचे अधोरेखित झालेले आहे.

मागील 30 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पारदर्शक कारभार करूनही सीबीआय आणि ईडी सारख्या संस्था देशमुखांविरोधात हात धुऊन मागे लागलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यात सचिन वाझे यांच्याकडून 100 कोटी घेतल्याचा खोटा आरोप देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावला.

त्यानंतर एकापाटोपाट कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अनिल देशमुख यांना गोवण्याचा खोटा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. देशमुख यांच्या घर, कार्यालयांवर सीबीआय व ईडीकडून छापेमारी सुरु आहे.

त्यात काहीही सापडलेले नाही. आतापर्यत अनिल देशमुख यांच्यावरच कारवाई का केली जात आहे? या प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना केंद्रीय गृहमंत्रालय मोकळीक का देत आहे ?

सिंग यांच्याकडे बेहीशेबी मालमत्ता आहे. तरीही, साधी विचारणा सीबीआय किवा अन्य संस्थेकडून झालेली नाही, याचे आश्चर्य वाटते. जणूकाही केंद्र सरकारने सिंग यांना क्लीन चिट दिल्याचे दिसत आहे. याचा अर्थ देशमुख यांना अडचणीत आणण्यासाठी परमवीर सिंग आणि केंद्र सरकारमध्ये करार तर झाला नसावा.”

Continue Reading
Click to comment
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Politics

Hardik Patel quits Congress, says no youngster is willing to work, vote; accuses leaders of ‘enjoying in abroad’

Published

on

By

Radhika Dhawad | Vadodara
Gujarat Working President Hardik Patel tendered his resignation from the Congress party today morning. Patel took to Twitter to announce his decision and shared an image of his resignation.
 
Patel said, “Big leaders of Congress in Gujarat are far away from issues of the state but are more focussed on ensuring that chicken sandwich for leaders who have come from Delhi is delivered on time!”
In the letter, he also said, “The party has constantly been working against the interests of the country and society.”

Hardik Patel’s letter to Congress President Sonia Gandhi

Continue Reading

Politics

BJP on course to retain power for 2nd straight term with CM Yogi Adityanath as CM again

Published

on

By

Radhika Dhawad | Lucknow

Yogi Adityanath

Yogi Adityanath

Early numbers reveal that the BJP has crossed the halfway mark with over 271 seats in Uttar Pradesh at 12:07 pm thus making its way to retain power for the second straight term in the state. Chief Minister Yogi Adityanath is all set to become the Chief Minister for the second time. 


While the BJP was leading in 271 seats, Samajwadi Party (SP) managed to secure 121 seats so far. The BSP has managed to secure five seats while Congress so far has four seats.

(With total 403 seats in UP, 202 is the halfway mark)

Continue Reading

Politics

Indian student killed during shelling in Ukraines Kharkiv

Published

on

By

Nation Next Newsroom | Mumbai

Representational image

Representational image

An Indian student was killed during shelling in Ukraines Kharkiv on Tuesday morning, Ministry of External Affairs informed in the afternoon. The Ministry tweeted: ?With profound sorrow we confirm that an Indian student lost his life in shelling in Kharkiv this morning. The Ministry is in touch with his family. We convey our deepest condolences to the family.

In Kharkiv, Ukraine’s second largest city, videos showed extensive damage from the Russian military assault. One video showed the city’s largest government building blown up.

While the student is yet to be named by the MEA, sources in the Karnataka state government told The Quint that he had been identified as Naveen Shekhrappa, from Haveri district, Karnataka. The 21-year-old was a student of medicine at Kharkiv National Medical University.

The News Minute reported that Shekhrappa was standing in a queue at a supermarket in Kharkiv to buy food when Russian shelling began.Continue Reading
Advertisement

Trending

0
Would love your thoughts, please comment.x
()
x